आरमोरी नगर परिषदेवर भाजपाचे वर्चस्व, पवन नारनवरे पहिले नगराध्यक्ष


- आठ नगरसेवक विजयी, परिवर्तन पॅनलला केवळ एकच जागा 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
स्थानिक नगर परिषदेच्या पहिल्या निवडणूकीची मतमोजणी आज २८ जानेवारी रोजी पार पडली असून भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. निवडणूकीत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदाचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत. तर आरमोरी नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून भाजपाचे पवन दिलीप नारनवरे हे ३ हजार ८२० मते घेवून विजयी झाले आहेत.
सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणूकीत भाजपाचे ८, काॅंग्रेसचे ६, शिवसेनेचा एक, भाकपा चा एक आणि परिवर्तन पॅनलचा एक उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणूकीत विविध पक्षातून नाराज झालेले अनेक उमेदवार पक्ष सोडून निवडणूकीत नशिब आजमावित होते. मात्र अनेकांना या निवडणूकीत पराभव स्वीकारावा लागला आहे.
विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक १ अ मधून भाजपाच्या गीता भुवनेश्वर सेलोकर, प्रभाग क्रमांक १ ब मधून भाजपचे भारत बावनथडे, प्रभाग क्रमांक २ अ मधून भाजपच्या सुनिता भोजराज चांदेवार, प्रभाग क्रमांक २ ब मधून भाजपाचे मिथून माणिक गेडाम, प्रभाग क्रमांक ३ अ मधून काॅंग्रेसच्या निर्मला अनिल किरमे, प्रभाग क्रमांक म ब मधून भाजपाचे हैदर पंजवानी,  प्रभाग क्रमांक ४ अ मधून भाकपाच्या सिंधु कवळूजी कापकर, प्रभाग क्रमांक ४ ब मधून काॅंग्रेसचे मिलींद मोरेश्वर खोब्रागडे, प्रभाग क्रमांक ५ अ मधून शिवसेनेचे प्रशांत गंगाधर सोमकुवर,  प्रभाग क्रमांक ५ ब मधून काॅंग्रेसच्या दुर्गा संजय लोणारे, प्रभाग क्रमांक ६ अ मधून काॅंग्रेसच्या उषाताई भिमराव बारसागडे, प्रभाग क्रमांक ६ ब मधून भाजपाचे विलास जगन्नाथ पारधी, प्रभाग क्रमांक ७ अ मधून काॅंग्रेसच्या किर्ती शालीकराम पत्रे, प्रभाग क्रमांक ७ ब मधून काॅंग्रेसचे प्रशांत मनोहर मोटवानी, प्रभाग क्रमांक ८ अ मधून भाजपाच्या प्रगती प्रशांत नारनवरे, प्रभाग क्रमांक ८ ब मधून परिवर्तन पॅनलचे सागर चंद्रशेखर मने आणि प्रभाग क्रमांक ८ क मधून  भाजपाच्या सुनिता रेवतीराम मने विजयी झाल्या आहेत.
निकालानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष केला आहे. विजयी उमेदवारांसह भव्य गुलाल उधळून जल्लोषात सर्व पदाधिकारी सहभागी झाले आहेत. प्रकाश सावकार पोरेड्डीवार हे सुध्दा जल्लोषात सहभागी झाले होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-28


Related Photos