आरमोरी नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक ४ वर भाजपाचे वर्चस्व


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी /आरमोरी :
स्थानिक नगर परिषदेच्या पहिल्या निवडणूकीची मतमोजणी सुरू असून प्रभाग क्रमांक १ व दोन मध्ये भाजपाने बाजी मारली आहे. तसेच भाजपचे अन्य उमेदवार सुद्धा विजयी झाले आहेत. 
 प्रभाग   क्रमांक १ अ नागरीकांचा मागास प्रवर्ग गटातून भाजपाच्या गीता भुवनेश्वर सेलोकर विजयी झाल्या आहेत. त्यांना ६६१ मते मिळाली आहे. प्रभाग क्रमांक १  ब मधून भाजपचे भारत बावनथडे हे विजयी झाले आहेत. त्यांना ७२९ मते मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक २ अ मधून भाजपाच्या सुनिता भोजराज चांदेवार विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक २ ब मधून भाजपाचे मिथून माणिक मडावी विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक ३ अ च्या निकालात काॅंग्रेसने यश मिळविले आहे. काॅंग्रेसच्या निर्मला अलिज किरमे यांनी ४८० मते घेवून विजय मिळविला आहे. प्रभाग क्रमांक ३ ब मधून भाजपाचे हैदर पंजवानी यांनी ४१४ मते घेवून विजय मिळविला आहे. प्रभाग क्रमाक ४ अ मधून सिंधु कवडूजी कापकर या विजयी झाल्या आहेत. त्यांना ५४६ मते मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक ४ ब मधून काॅंग्रेसचे मिलींद मोरेश्वर खोब्रागडे हे ५४८ मते घेवून विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक ५ अ मधून शिवसेनेचे प्रशांत गंगाधर सोमकुंवर हे ५९० मते घेवून विजयी झाले आहेत. तर प्रभाग क्रमांक ५ ब मधून काॅंग्रेसच्या दुर्गा संजय लोणारे यांनी ५६४ मते घेत विजय मिळविला आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-28


Related Photos