महत्वाच्या बातम्या

 दुय्यम निबंधक कार्यालय सुट्टीच्या दिवशी सुरु


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी जनतेच्या सोयीसाठी काही नोंदणी कार्यालये शनिवार व रविवार यासुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नागपूर येथील सह दुय्यम निबंधक वर्ग-२ (नागपूर शहर क्र.२) आणि सह दुय्यम निबंधक वर्ग-२ (नागपूर शहर क्र. ५)  शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी ही कार्यालये सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत सुरु राहतील. तर सोमवार व मंगळवार बंद राहील, असे सह जिल्हा निबंधक वर्ग-१तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नागपूर शहर यांनी कळविले आहे.   





  Print






News - Nagpur




Related Photos