महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर शहरातील गांधी वॉर्डातील चौक सौंदर्यकरण चे लोकार्पण संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : 16 मे रोजी, चौक सौंदर्यकरण चे लोकार्पण केले गेले. शहरातील गांधी वॉर्डातील जोड हनुमान मंदिर चौकात चंदन सिंह चंदेल माजी अध्यक्ष, वन विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी काशीनाथ सिंह शहर अध्यक्ष भाजपा बल्लारपूर, ज्येष्ठ नेते बुचय्या कंदीवार, बाळकृष्ण गोंदे मामा, जगदीश गहेरवार, मारुती नांदेकर, गजानन घुगुल, माजी नगर सेविका सौ.सारिका कनकम, ज्येष्ठ नेते दिलीप पाठक, लक्ष्मण पोहणे, लक्ष्मण कनकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

बल्लारपूर शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये गेल्या पाच वर्षांपासून रस्ते, भुयारी गटार, पदपथ, ग्रीन जिम, सार्वजनिक ठिकाणे व चौकांचे सुशोभीकरण, एलईडी पथदिवे यामुळे प्रभागाचा चेहरा-मोहरा बदलत आहे.  आज या विकास कामांतर्गत सौ.सारिका कनकम माजी नगरसेविका यांच्या अथक परिश्रमातून गांधी वॉर्ड मधील जोड हनुमान मंदिर चौक येथे चौक सौंदर्यकरण करण्यात आले. आज त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे हे मंदिर परिसर आणि चौक अधिकच सुंदर आणि सुशोभित दिसत आहे. या चौक सौंदर्यकरण उद्घाटन कार्यक्रमाच्या शुभमुहूर्तावर गांधी वॉर्डातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण कनकम, वसंतराव मंगरूळकर, रमेश शेंडे, मारोती इटनकर, सौ.सरस्वती डांबरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सतीश कनकम, प्रकाश दोत्तेपेल्ली, हरिबाबू लंका, शुभम बहुरिया, भास्कर पेंदोर, मनीष चौहान, नितीन बौराशी, पवन कोत्तुर, अजय दासरवार, कार्तिक जैस्वाल, सौ. सुरेखा धांडे, सौ. कविता दासरवार, सौ. सुमन मंगरूळकर, सौ. प्रभा मालखेडे, कु. मरियम दासरवार, कु. याशिका कनकम, कु. रांची धांडे, कु. शिवन्या कनकम आदींची प्रमुख उपस्थिती होती. सतीश कनकम यांनी कार्यक्रमाचे संचालन करून आभार व्यक्त केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos