उसेगाव येथे वाघाच्या हल्ल्यात इसम ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
गौरव नागपूरकर / देसाईगंज :
गुरे चारण्यासाठी शेतात गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना तालुक्यातील उसेगाव येथे काल रविवार २७  जानेवारी  रोजी घडली. कालपासून शोधमोहिम राबविल्यानतर आज २८ जानेवारी  रोजी त्याचे प्रेत हाती लागले आहे.
पांडूरंग सयाम (५५) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. पांडूरंग सयाम व कुसन कापगते हे दोघे गुरे चारण्यासाठी जंगलालगतच्या शेतात गेले होते. मात्र पांडूरंग सयाम यांच्यावार वाघाने हल्ला करून फरफटत जंगलात घेवून गेले. सायंकाळी कुसन कापगते हे एकटेच गावात परतले. यामुळे गावकरी व वनविभागाच्या पथकाने कालपासून शोधमोहिम सुरू केली होती. काल रात्री १२ वाजतापर्यंत काहीच हाती लागले नाही. आज सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पुन्हा शोधमोहिम राबविली असता पांडूरंग सयाम यांचे प्रेत आढळून आले.
तालुक्यातील कोंढाळा - उसेगाव परिसरामध्ये मागील दोन ते तीन वर्षांपासून वाघाचे वास्तव्य आहे. मात्र आजपर्यंत वाघाने मनुष्यहाणी केलेली नव्हती. याआधी तीन गायींना वाघाने भक्ष्य बनविले होते. यामुळे आता वाघाची दहशत निर्माण झाली आहे. कासवी, उसेगाव, कोंढाळा परिसरात या वाघाचे बस्तान आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-28


Related Photos