महत्वाच्या बातम्या

 परिवहन विभागतर्फे अनुज्ञप्ती शिबीराचे आयोजन


- वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी तालुक्यांचा समावेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती इत्यादी कामांकरिता वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी या तालुक्याच्या ठिकाणी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी 15 तारखेपासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
परिवहन विभागाच्या कार्यक्रमानुसार 19 मे 2023 रोजी आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 22 मे रोजी एन.एच.महाविद्यालय, ब्रम्हपुरी, 23 मे रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर, 24 मे रोजी शासकीय विश्रामगृह चिमूर व 25 मे रोजी शासकीय विश्रामगृह गोंडपिपरी, या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे. 





  Print






News - Chandrapur




Related Photos