महत्वाच्या बातम्या

 प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या निविदांवर कंत्राटदारांचा बहिष्कार 


- तातडीने लक्ष घालण्याचे खासदार व आमदारांना साकडे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : अतिदुर्गम व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात कंत्राटदारांना अडचणींना तोंड द्यावे लागत असतांना वन विभागातील अधिकारी एनओसी करीता ना हरकत प्रमाणपत्रा करिता स्वार्थापोटी कंत्राटदारांना नाहक त्रास देऊन भरमसाठ मागणी करीत असल्याची बाब उघडकीस आली. 

जनतेच्या सुलभ  आवागमन मधील जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करून शासनाच्या कामात व्यतय आणत असल्याने तथा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांचे दर लागतीनुसार कमी असल्याने या दोन्ही बाबींमध्ये खासदार व आमदारांनी तातडीने लक्ष घालावे. याकरिता सर्व कंत्राटदारांनी मागणी वजा साकडे घातले. सदर स्थिती तातडीने निवडण्याकरिता निविदेवर बहिष्कार सुद्धा टाकत असल्याचे घोषित केले. 

याप्रसंगी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खा. अशोक नेते व आ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे यांनी कंत्राटदार संघटनेला १५ मे २०२३ रोजी गडचिरोली येथील विश्रामभवनात बैठकी दरम्यान आश्वासन दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos