महत्वाच्या बातम्या

 आलापल्ली येथील सुनिता अरका यांना शिक्षणासाठी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील रहवासी कु. सुनिता व्येंकटेश अरका या मुलीला (जीएनएम) नर्सिंगच्या शिक्षणासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील देओनील स्कूल ऑफ नर्सिंग, मूल येथे जायचे होते, तिथे तिला या महाविद्यालयात प्रवेश ही निश्चित झाले होते, परंतु तिची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. तिचे कुटुंब रोजंदारी करून उदरनिर्वाह करीत आहे. या परिस्थितीत तिने आलापल्ली इथून १२ वीचे शिक्षण चांगल्या गुणवत्तापूर्ण पूर्ण केले आहे. पुढील शिक्षणासाठी तिला मूल येथे जायचे आहे. परंतु आर्थिक अडचण निर्माण झाल्याने तिच्या कुटुंबातील सदस्य सर्व चिंतेत पडले होते. पण ही बाब गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या लक्षात येताच त्यांनी आलापल्ली येथील कु. सुनिता व्येंकटेश अरका या मुलीला (जीएनएम) नर्सिंगच्या शिक्षणासाठी ४० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आधार मिळाला आणि सुनीताच्या पुढील शिक्षणासाठी तसेच सर्वतोपरी पुन्हा मदत करण्याच आश्वासन सुध्दा राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिले.

विशेष बाब म्हणजे अहेरी इस्टेटचे दानशूर राजे अम्ब्रिशराव आत्राम हे अनेकदा आपल्या दानवीर स्वभावाने आपल्या क्षेत्रातील चांगले शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणित असलेल्या अनेक मुला-मुलींना मदत करीत असतात आणि त्यांनी आतापर्यंत अनेक गरजुना आर्थिक मदत केली आहे.

यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, दिलीप सिडाम, राजेश्वरी तलांडे ग्रामपंचायत कर्मचारी तसेच विकास तोडसाम राजे फोटोग्राफर, रवि जोरीगलवार, कु सुनिता अरका यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos