पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्या उपस्थितीत विदर्भ न्यूज एक्सप्रेसचा वर्धापन दिन उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
 आज २६ जानेवारी रोजी विदर्भ न्यूज एक्सप्रेस वेब पोर्टल , यु ट्युब चॅनलचा चा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे आदिवासी विकास, वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे विमोचन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
एडीटर फोरम च्या काॅन्फरन्स हाॅलमध्ये आयोजित वर्धापन दिन कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर,  विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे संपादक मनिष कासर्लावार, एडिटर फोरम चे सचिव नरेंद्र माहेश्वरी  यांच्यासह एडीटर फोरमचे पदाधिकारी, जिल्ह्यातील पत्रकार, विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे प्रतिनिधी उपस्थित होते. ऑनलाईन मीडीयाच्या क्षेत्रात दोन वर्षांच्या कार्यकाळात विदर्भ न्यूज एक्सप्रेसने अनेक योजना, घडामोडी, घटनांना तातडीने प्रकाशित करून विदर्भातच नव्हे तर संपूर्ण राज्यात नावलौकीक मिळविला आहे. यापुढेसुध्दा विदर्भ न्यूज एक्सप्रेस अशीच घोडदौड करीत राहिल, असे गौरवोद्गार ना. आत्राम यांनी काढले. 

 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-26


Related Photos