एडीटर फोरम संघटनेच्या प्रेस काॅन्फरन्स हाॅलचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्याहस्ते उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
प्रिंट, ऑनलाईन आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये कार्यरत पत्रकारांनी तयार केलेल्या एडीटर फोरम संघटनेच्या प्रेस काॅन्फरन्स हाॅलचे राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्याहस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले.
धानोरा मार्गावरील पोरेड्डीवार काॅम्प्लेक्समधील काॅन्फरन्स हाॅलमध्ये आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, एडीटर फोरमचे अध्यक्ष तथा विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे संपादक मनिष कासर्लावार, एडीटर फोरमचे सचिव तथा दैनिक महासागरचे जिल्हा प्रतिनिधी नरेंद्र माहेश्वरी आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम ना. आत्राम यांनी फित कापून काॅन्फरन्स हाॅलचे उद्घाटन केले. यानंतर दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतीमेला माल्यार्पण तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ना. आत्राम म्हणाले, वृत्त माध्यमे हे जनता आणि शासन, प्रशासनातील दुवा आहे. यामध्ये आता कालानुरूप बदल होत आहे. सोशल मीडीयाचे जग असून आता वृत्तपत्र क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. आता ऑनलाईन मीडीयाने अख्खे जग जवळ आले आहे. एखादी घटना, कार्यक्रमाची इत्यंभूत बातमी काही मिनिटात जगात वाचायला मिळत आहे. मीडीयात झालेले बदल शासनानेही स्वीकारले आहे. त्यानुसार सकारात्मक नियमावली लागू करण्यात आली आहे. याचा फायदा नक्कीच होईल. जनतेला ऑनलाईन मीडीयाच्या माध्यमातून योजना, शासकीय घडामोडी तातडीने मिळतील. मीडीयाद्वारे चांगल्या गोष्टी पोहचविणे गरजेचे आहे. लोक अफवांवर लवकर विश्वास ठेवतात. यामुळे अफवा रोखण्याचा प्रयत्न मीडीयाने करावे. 
गडचिरोली हा मागास जिल्हा असून जिल्ह्यात काम करीत असताना जिल्ह्याबाहेरील लोकांना जिल्ह्यात येण्याची ओढ लागावी, असे लिखाण करावे. जिल्ह्यातील पर्यटनास चालना मिळेल या दृष्टीने जिल्ह्यातील नैसर्गिक गोष्टींवर प्रकाश टाकावा, असे ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम म्हणाले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या तसेच पत्रकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी वृत्तपत्र क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. सर्व माध्यमांना सामावून घेत शासनाच्या योजना वेगाने प्रसारीत करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशिल असल्याचे ते म्हणाले. यावेळी एडीटर फोरमचे अध्यक्ष मनिष कासर्लावार, सचिव नरेंद्र माहेश्वरी यांनीही मार्गदर्शन केले. संचालन साप्ताहिक वैनगंगा पुकारचे संपादक मुनिश्वर बोरकर यांनी केले. आभार दै. पुण्यनगरीचे ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी प्रल्हाद म्हशाखेत्री यांनी मानले. 
कार्यक्रमाला एडीटर फोरमचे उपाध्यक्ष तथा गोंडवाना टाईम्सचे संपादक व्यंकटेश दुडमवार, सहसचचिव तथा दै. महाविदर्भचे जिल्हा प्रतिनिधी अनिल बोदलकर, कोषाध्यक्ष तथा पोलिस डायरी वेबपोर्टलचे प्रतिनिधी चंद्रकांत पतरंगे, प्रसिध्दी प्रमुख तथा पोलिस नजर चे जिल्हा प्रतिनिधी अजय कुकडकर, संघटक तथा जय विदर्भ न्यूज चे रितेश वासनिक, ई टीव्ही भारतचे जिल्हा प्रतिनिधी मंगेश भांडेकर, साप्ताहिक क्रांती प्रेरणा च्या संपादिका रेखाताई वंजारी, गडचिरोली टाईम्स चे संपादक इलियास पठाण, अशोक कत्रोजवार, होमदेव कुरवटकर, दीपक जाधव, आनंद दहागावकर, भगवान गेडाम, विजय लडके, वहीद  शेख  आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र पानेमवार , आदर्श गेडाम यांनी सहकार्य केले.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-26


Related Photos