महत्वाच्या बातम्या

 पोलीस स्टेशन आरमोरी व युवारंगच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियमांची जनजागृती


- अपघातांचे प्रमाण आढलेले आहेत वाहने हळू चालवा व हेल्मेट चा वापर करून आपला जीवन सुरक्षित करा : राहुल जुआरे 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : युवारंग तर्फे २६ एप्रिल २०२३ पासून सुरू झालेल्या निशुल्क समर कॅम्प मध्ये आज १३ मे २०२३ शनिवारला सकाळी १०:०० वाजता छत्रपती चौक टी पॉईंट, आरमोरी येथे पोलीस स्टेशन, आरमोरी व युवारंग यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियम जनजागृती करण्यात आली. ज्यामध्ये  ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना युवारंग निशुल्क समर कॅम्पच्या विद्यार्थ्यांनी वाहन चालवतांना हेल्मेट लावण्याचे फायदे व वाहन हळू गतीने चालविणे याबाबत सांगितले व वाहतुकीच्या नियमांचे परिपत्रक वितरित करून ड्रायव्हिंग लायन्सन्स चे महत्व सांगण्यात आले व वाहन चालकांना आंबाळीचे शरबत वितरित करण्यात आले. टी पॉईंट ते शक्ती नगर पर्यंत वाहतूक नियम जनजागृतीची रॅली काढण्यात आली.   

याप्रसंगी युवारंगचे अध्यक्ष राहुल जुआरे, वाहतूक पोलीस हवालदार रमेश बगमारे, पोलीस नाईक वसीम पठाण, होमगार्ड पथक आरमोरी इंचार्ज अनिल सोमनकर, गृहरक्षक दलाचे जवान मोरेश्वर मेश्राम, प्रमोद गोंदोळे, वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरीचे अध्यक्ष देवानंद दुमाने, समाजसेवक केवळराम किरणापुरे, प्रशांत दोनाडकर, युवारंगचे  उपाध्यक्ष मनोज गेडाम, युवारंग निशुल्क समर कॅम्पचे संयोजक रोहित बावनकर, लीलाधर मेश्राम, युवारंगचे सदस्य पंकज इंदूरकर, सुमित खेडकर, गोलू नागापुरे व शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos