महत्वाच्या बातम्या

 वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँकांच्या ५ नवीन शाखा सुरू


- खा. रामदास तडस यांची केन्द्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे मागणी

- विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये बँकांच्या नवीन शाखा ग्रामीण भागात सुरू करण्याची केली मागणी

- तळेगाव (टा) ता. वर्धा, दहेगाव (गोसावी) ता. सेलू, रसुलाबाद ता. आर्वी, नारा ता. कारंजा (घा), वेळा जि. हिंगणघाट या गावात नविन शाखा सुरु करण्याबाबत केली मागणी.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : २०११ च्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख आहे. जी सध्या सुमारे २८ लाखाच्या घरात असेल. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका (११४ शाखा) आणि ग्रामीण बँका (६ शाखा) नागरिकांना आवश्यक बँकिंग सेवा पुरविण्यास अपुऱ्या आहेत. यासोबतच वर्धा डिस्ट्रिक्ट क्रेडिट क्र. बँकेचे आर्थिक व्यवहार बंद असून या बँकेच्या ४८ शाखा १५ वर्षांपासून बंद आहेत. तळेगाव (टा) ता. वर्धा, दहेगाव गोसावी ता. सेलू, रसुलाबाद ता. आर्वी, नारा ता. कारंजा घाडगे, वेळा ता. हिंगणघाट इ. मोठ्या गावात कोणत्याही बँकेच्या शाखा नाहीत. या गावांच्या आजूबाजूला ५ किमीच्या परिघात सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शाखा नाहीत, या सर्व गावांची लोकसंख्या सध्या ५ हजार च्या वर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आर्थिक समावेशाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा नसलेल्या ग्रामीण भागात बँक शाखा उघडण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी विभागीय स्तरीय बैठकीला नागपूर येथे आले असता केन्द्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना केली. तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये बँकांच्या ग्रामीण शाखा नसल्यामुळे विदर्भातील ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासात आणि रोजगार निर्मितीमध्ये अडथळे येत आहेत, त्यामुळे संपुर्ण विदर्भात आवश्यक असलेल्या ठिकाणी ग्रामीण शाखा उघडण्याची मागणी सुध्दा यावेळी केली. यावर केन्द्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सकारात्मक प्रतिसाद या विदर्भात आवश्यक असलेल्या ठिकाणी ग्रामीण शाखा सुरु करण्याकरिता आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

ग्रामीण भागात वर्धा डिस्ट्रिक्ट क्रेडिट कं. बँकेच्या अनेक शाखा कार्यरत असल्यामुळे ग्रामीण भागातील व्यवहार या माध्यमातुन सुरु होते, परंतु गेल्या अनेक वर्षापासून वर्धा डिस्ट्रिक्ट क्रेडिट क्र. बँकेच्या ४८ शाखा गेल्या आर्थिक व्यवहार बंद असलयामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार राष्ट्रीयकृत बॅंकेवर अवलंबुन आहे, परंतु अनेक ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बॅकेच्या शाखा नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, सर्वसामान्य नागरीक व महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कारणाने तळेगाव (टा) ता. वर्धा, दहेगाव गोसावी ता. सेलू, रसुलाबाद ता. आर्वी, नारा ता. कारंजा घाडगे, वेळा ता. हिंगणघाट इ. मोठ्या गावात राष्ट्रीयकृत बॅकेच्या शाखा सुरु करण्याची मागणी केली, यासोबतच विदर्भातील सर्व आवश्यक असलेल्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बॅकेच्या शाखा सुरु करण्याची मागणी करण्यात आली. मागणीला निश्चीतच यश मिळेल, असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी यावेळी व्यक्त केला.     





  Print






News - Wardha




Related Photos