महत्वाच्या बातम्या

 व्हॉलीबॉल खेळात स्फूर्तीचे नाव आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर : प्रा. डॉ. प्रशांत खुळे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / वरोरा : मागील ४४ वर्षापासून वरोरा शहरात स्फूर्ती स्पोर्टिंग क्लब वरोरा व्हॉलीबॉल खेळाडू घडविण्याचे सातत्याने काम करीत आहे. स्फूर्ती क्लबने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू घडविले. एक क्रीडा संघटना मागील चार दशकापासून अविरतपणे काम करीत आहे. आता अधिक जोमाने काम करते, याचा अभिमान आहे. व्हॉलीबॉल खेळात स्फूर्तीचे नाव आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर कोरले गेले, असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रशांत खुळे यांनी केले. स्फूर्ती स्पोर्टिंग क्लब वरोराच्या वतीने ४४ व्या व्हॉलीबॉल उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष प्रा. डॉ. आर.आर. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. प्रशांत खुळे स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे कार्याध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष, श्याम अली पोलीस निरीक्षक, अमोल काचोरे अस्थिरोग तज्ञ तथा गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. सागर वझे, दिशा एज्युकेशन पॉईंटचे प्राध्यापक गणेश पावडे, बालरोग तज्ञ डॉ. नितीन देवतळे, स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे सचिव सुनील जवदड मंचावर उपस्थित होते. 

डॉ. नितीन देवतळे, डॉ. सागर वझे यांनी व्यायाम केल्यानंतर शरीरात कोणकोणते फायदे होतात. याचे महत्त्व विशद केले. माजी नगराध्यक्ष अह श्याम अली प्रा. गणेश पावडे, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी व्हॉलीबॉल खेळामध्ये प्राविण्य मिळवल्यास भविष्यात काय काय खेळाडूंना लाभ होतात. याविषयी मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे ज्येष्ठ खेळाडू ईकराम पटेल यांनी केले. संचालन स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रा. प्रयाग ठाकरे यांनी तर उपस्थितांचे आभार स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे प्रसिद्धीप्रमुख प्रवीण खिरटकर यांनी मानले. कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी पालक स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे पदाधिकारी खेळाडू व आश्रयदाते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 





  Print






News - Chandrapur




Related Photos