राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारांची घोषणा : महाराष्ट्रातील ४४ पोलिसांना पुरस्कार जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली  :
राष्ट्रपती पुरस्कारांची व राष्ट्रपती पोलिस पदक पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली असून राज्यातील ४४ पोलिसांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  
राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्राला एकूण ४४ पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपती पुरस्कृत जीवन रक्षा पदक ४८ बहादूर पोलिसांना देण्यात येत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील ५  पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी दोन पोलीस अधिकाऱ्यांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, दोन पोलीस अधिकाऱ्यांना उत्तम जीवन रक्षा पदक आणि एकास जीवन रक्षा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.     Print


News - World | Posted : 2019-01-25


Related Photos