मुसपर्शी जंगलात झालेल्या चकमकीत एका नक्षल्याचा खात्मा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली :
तालुक्यातील गट्टा (जांभिया) पोलिस मदत केंद्रापासून जवळच असलेल्या छत्तीसगड सीमेवरील मुसपर्शी जंगलात आज सकाळी  पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत एका नक्षलाचा खात्मा करण्यात पोलीस विभागाला यश आले आहे . तसेच घटनास्थळावरून नक्षली साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे . 
 नक्षल्यांनी २२ जानेवारीला भामरागड तालुक्यातील कसनासूर येथील तीन आदिवासींची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर जिल्हाभरात पोलिसांनी  नक्षल विरोधी अभियान राबविण्यास सुरुवात केली. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युतर देताच नक्षल्यांनी  जंगलाच्या दिशेने पळ काढला . घटनास्थळाची पाहणी केली असता एका पुरुष नक्षल्याचा मृतदेह आढळून आला. 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-01-25






Related Photos