महत्वाच्या बातम्या

 पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञ अरुण मलिक यांच्यावर एफ आय आर दाखल करा



- आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची जिल्हाधिकारी यांना सूचना

- वारंवार सूचना देऊनही मार्कंडेश्वर मंदिराच्या निर्माण संदर्भात असलेल्या बैठकीला गैरहजर राहत असल्याने कारवाई करण्याची केली मागणी

- मार्कंडेश्वर मंदिरा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न

- बैठकीला अरुण मलीक अनुपस्थित राहिल्याने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : मागील ७-८ वर्षांपासून मार्कंडेश्वर मंदिराचे दुरुस्तीचे काम अपूर्ण अवस्थेत असून ते पूर्ण करण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने मंदिराचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी मार्कंडेश्वर मंदिर समिती व सदस्य भक्त भाविक सातत्याने प्रयत्न करीत. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले असता बैठकीला पुरातत्व विभागाचे पुरातत्त्व शास्त्रज्ञ अरुण मलिक अनुपस्थित राहिले. मार्कंडेश्वर मंदिर संदर्भात आयोजित बैठकांना पुरातत्त्व विभागाचे अधिकारी नेहमीच अनुपस्थित राहत आहेत. 

या संदर्भामध्ये सूचना करूनही व बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र देवूनही पुरातत्त्व विभागाचे पुरातत्त्व शास्त्रज्ञ अरुण मलिक अनुपस्थित राहिल्याने त्यांच्यावर कामांत निष्काळजीपणा करीत असल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सूचना आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आजच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos