महत्वाच्या बातम्या

 वर्धा लोकसभा मतदार संघातील सर्व प्रलंबित प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करा : खासदार रामदास तडस


-  विभागीय रेल्वे प्रबधंक यांच्याकडे आढावा बैठक संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : कोविड-१९ नंतर परिस्थीती पुर्ववत असतांना रेल्वे प्रशासनाने कोविड काळात बंद करण्यात विविध रेल्वे थांबे पुर्ववत करणे आवश्यक आहे. हिंगणघाट व इतर ठिकाणी पुर्वीपेक्षा फारच कमी गाडयाचे थांबे असल्याने हिंगणघाट येथील नागरीक आक्रमन झालेले आहे. याकरित रेल्वे मंत्री यांची भेट घेतली असुन त्याच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आपल्या माध्यमातुन विविध रेल्वे थांब्याबाबत सकारात्मक प्रस्ताव सादर करावा, अमृत भारत स्टेशन अंतर्गत महाराष्ट्रातील १२३ स्टेशनचा विकास होणार आहे. यामध्ये वर्धा लोकसभा क्षेत्रातील धामणगांव, हिंगणघाट, पुलगांव, सेवाग्राम व वर्धा समावेश असल्यामुळे वर्धा लोकसभा क्षेत्रातील या स्टेशनचा कामांना गती प्रदान करणे, तसेच वर्धा लोकसभा क्षेत्रातील प्रगतीपथावर व प्रस्तावीत कामांना गती प्रदाण करावी, श्रीक्षेत्र रिध्दपूर येथे नविन रेल्वेस्थानक निर्मीती करिता प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी रेल्वेमंत्रालयाकडे सादर झालेला असुन त्याला मान्यता मिळालेली नाही, महाराष्ट्र शासनाने रिध्दपूर येथे स्वतंत्र मराठी विद्यापीठ, विकास आराखडा, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे अभ्यास केन्द्र स्थापन झाले असुन या ठिकाणी रेल्वे स्थानक मंजुर करण्यासाठी स्मरण प्रस्ताव पुन्हा सादर करावा, ग्रामीण भागातील प्रवासी वर्गाकरिता प्रवासी गाड्या भुसावळ-नागपूर, अजनी-काजीपेठ आणि सर्व पॅसेंजर ट्रेन पुर्ववत करणे आवश्यक असल्यामुळे सकारात्मक प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करावा, तसेच वर्धा लोकसभा मतदार संघातील सर्व प्रलंबीत प्रस्ताव केन्द्रसरकारकडे सादर करावे, अशा सुचना यावेळी खासदार रामदास तडस यांनी बैठकीमध्ये अधिकारी वर्गाला दिले.

वर्धा लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवर चर्चा आणि आढावा बैठक खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली, बैठकीला विभागीय रेल प्रबधंक तुषार कांत पांडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक आशुतोश श्रीवास्तव, परीचलन व्यवस्थापक कृष्णा पाटील, रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी वर्धा लोकसभा मतदारसंघांतर्गत प्रगती/प्रस्तावित कामे, कोविड-१९ पूर्वी मंजूर असलेले रेल्वे थांबे पुर्ववत करणे, प्रवासी गाड्या (भुसावळ-नागपूर, अजनी-काजीपेठ) आणि सर्व पॅसेंजर ट्रेन पुर्ववत करणे, नंदीग्राम एक्सप्रेसचे पुर्ववत करणे, वर्धा-नांदेड नई रेल लाईन प्रगती, प्रवासी वर्ग संबधीत विविध विषय व समस्या, सेवाग्राम-हिंगणघाट बायपास कॉरिडॉर, अमृत भारत स्टेशन, रिध्दपूर हॉल्ट स्टेशन तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

लोकसभा सदस्य तसेच वर्धा लोकसभा मतदार संघाचा प्रतिनीधी म्हणून नेहमीपणे लोकसभेत, रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, रेल्वे महाप्रबधंक, मंडल रेल्वे प्रबधंक यांची वेळोवेळी भेट घेऊन नागरिकांच्या व प्रवासी वर्गाच्या समस्या शासनापर्यंत पोहचविण्याचे कार्य केले आहे. तसेच मध्य रेल्वेच्याही माध्यमातुन रेल्वेसंबधी समस्या सोडविण्याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे. रेल्वे विभागाने योग्य रीतीने कार्य केल्यास प्रवासी वर्गाच्या समस्या सोडविणे कठीन जाणार नाही, असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.





  Print






News - Wardha




Related Photos