महत्वाच्या बातम्या

 संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनेंतर्गत होणार कर्जवाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सामाजिक न्याय विभागातंर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ चंद्रपूर येथे 49 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.


महामंडळाच्या कर्ज प्रकरणातील 26 विविध योजनेअंतर्गत कर्जवाटप करण्यात येणार आहे. सन 2016 पासून बंद असलेल्या विविध योजना सुरू करण्यात आल्या असून समाज बांधवांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांनी प्रशिक्षणाची गरज असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे थेट कर्ज योजनेतून 50 हजार रुपयांऐवजी 1 ते 10 लाखापर्यंतचे कर्ज हवे आहे. तर अनुदान 10 हजार रुपयावरुन 20 हजारापर्यंत वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.


यावेळी उपस्थित लाभार्थी व पदाधिकाऱ्यांना योजनांची माहिती पत्रके देण्यात आली. नवीन कर्ज योजनेची अर्ज देणे सुरू झाले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक विजयालक्ष्मी मनिरत्न यांनी केले. याप्रसंगी बार्टीचे प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले, सामाजिक व विविध संस्थांचे पदाधिकारी गोकुळ बनसोड, संतोष तांडेकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघ जेष्ठ नागरिक शाखेचे मोतीलाल भांडेकर, राष्ट्रीय चर्मकार महिला महासंघाच्या अध्यक्षा गुणवंता कनोज, प्रणाली बनसोडे, बहुउद्देशीय संत रविदास महाराज महिला मंडळाच्या अध्यक्षा शीला ढाक आदींची उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos