महत्वाच्या बातम्या

 तस्कराच्या पोटातून काढले पाव किलो सोने : जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांची कामगिरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : परदेशातून बेकायदा मार्गाने सोने देशात आणण्यासाठी प्रवासी अनेकदा वेगवेगळ्या क्लृप्त्या अवलंबतात. मात्र, विमानतळावरील चाणाक्ष, सजग सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नजरेतून हे गैरप्रकार सुटत नाहीत. संशयावरून प्रवाशाला पकडले की, त्याने केलेल्या गैरप्रकाराची पोलखोल करून त्याची रवानगी पोलिसांकडे केली जाते. परंतु सोन्याचा हव्यास असलेले काही प्रवासी अनेकदा वेगळाच मार्ग पत्करतात. अशांना मग हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते. असाच प्रकार जे.जे. रुग्णालयात नुकताच उघडकीस आला. सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशाने तब्बल १४ लाख रुपयांचे पाव किलो सोने पोटातून आणले होते.

माहितीनुसार कस्टमच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर इंतिजार अली या ३० वर्षीय प्रवाशाला ताब्यात घेतले. सदर प्रवाशाने सोने दडवून आणल्याचा कस्टम अधिकाऱ्यांना संशय होता. चौकशीमध्ये अलीने गुन्ह्याची कबुलीही दिली.

अलीची जे.जे. रुग्णालयात रवानगी करण्यात आली. त्याला सलग तीन दिवस हाय फायबर डाएट दिला गेला. त्यात दररोज एक डझन केळी खायला देण्याचा समावेश होता. रुग्णालयाच्या सर्जरी विभागात दाखल केल्यानंतर त्याचा एक्स-रे काढण्यात आला. त्यात त्याची तस्करी उघड झाली. एक्स रे मध्ये तस्कराच्या पोटात सोने आढळून आले. या एरव्ही तस्करांच्या पोटातून अमली पदार्थाच्या गोळ्या काढण्यात आले. सोन्याचे सात तुकडे इंतिजार अलीने प्लास्टिकचे वेष्टन लावत गिळले होते. सुमारे पाव किलो वजनाचे हे सोने कस्टम अधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आले.





  Print






News - Rajy




Related Photos