महत्वाच्या बातम्या

  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध - माजी मंत्री वडेट्टीवार


-गोळीबार करणाऱ्यांना तात्काळ अटक करा - अन्यथा काँग्रेसचे जिल्हाभर आंदोलन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : गुरुवार रात्री ९.३० वाजताच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मूल परिसरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोष सिंह रावत यांचेवर गोळीबार करून प्राणघातक हल्ला करण्यात आले. या हल्ल्यात जिल्हा बँक अध्यक्ष रावत यांना दुखापत झाली. या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून जिल्हा बँक अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या वर करण्यात आलेला भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत यामागील मुख्य सूत्रधार कोण..? याचा तातडीने शोध घ्यावा अन्यथा जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा सज्जड इशारा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष संतोष सिंह रावत हे जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे नेते मानले जातात. ते मुल येथील रहिवासी असून नेहमीप्रमाणेच आज सायंकाळच्या सुमारास त्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मुल परिसरात गेले असता काही अज्ञात इसमांनी त्यांचेवर गोळीबार केले. या प्राणघातक हल्ल्यात त्यांच्या हाताला गोळीचा स्पर्श होऊन दुखापत झाली. यात बँक अध्यक्ष रावत हे थोडक्यात बचावले. अज्ञात हल्लेखोरांकरवी गोळीबाराचा मूल शहरातील हा पहिलाच व अतिशय निंदनीय प्रकार होय. याची माहिती सर्वत्र पसरतात मूल शहर हादरले. जिल्ह्यातील काँग्रेस गोट्यातील महत्त्वपूर्ण नेते संतोष सिंह रावत यांचे वर झालेला भ्याड हल्लामुळे मूल शहरातील काँग्रेस पदाधिकारी , कार्यकर्ते व त्यांचा चाहता वर्ग यांसह राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी सदर हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला असून जिल्हा बँक अध्यक्ष संतोष रावत यांचे वर हल्ला करणाऱ्यांना तसेच या हल्ल्या मागे मुख्य सूत्रधार कोण..? या प्रकरणाची तातडीने चौकशी करून ४८ तासाच्या आत आरोपी व मुख्य सूत्रधार यांना बेड्या ठोकाव्या असा अन्यथा जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. राजकीय नेत्यांवर गोळीबार करण्याची घटना जिल्ह्यात प्रथमतः घडलेली असून पोलीस विभागामार्फत सदर गंभीर घटनेची कसून चौकशी करून हल्लेखोर दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांनी केली आहे.






  Print






News - Chandrapur




Related Photos