अमरावती वनवृत्तात वनाधिकारी, कर्मचारी व पोलिसांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेने केला निषेध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी / गडचिरोली :
२२ जानेवारी  रोजी दुपारी ३  वाजता  अमरावती वनवृत्तात वन कर्मचारी व पोलीस अधिकारी यांच्यावर  झालेल्या प्राणघातक हल्याच्या निषेधार्थ  कास्ट्राईब वन कर्मचारी संघटना  गडचिरोली  च्या वतीने निषेध करण्यात आला. हल्लेखोरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी  आज  २४ जानेवारी रोजी  उपवनसंरक्षक  गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले. 
२२ जानेवारी  रोजी दुपारी ३ वाजता उपवनसंरक्षक, अकोट व पोलीस अधिकारी आंदोलन करणाऱ्या गावकर्यांना समजावून सांगण्यासाठी गेले होते. तसेच  ज्या आंदोलनकर्त्याना जंगलाबाहेर जायचं आहे त्यांच्यासाठी  बसची व्यवस्था वनविभागाकडून करण्यात आली होती.  आंदोलनकर्त्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यात आल्या आहे अशी माहिती देण्यासाठी वनाधिकारी व पोलीस  या आंदोलन ठिकाणी गेले होते.
सदर चर्चा शांततेत सुरु असताना काही आंदोलक हिंसक झाले व त्यानी पोलीस व वनविभागच्या कर्मचाऱ्यांवर दगड फेकसुरु केली. तसेच विळा व  कुऱ्हाडींच्या साहाय्याने  हल्ला केला. सदर हल्ल्यात ५० वनकर्मचारी व १५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.  यांपैकी २ - ३  कर्मचाऱ्यांची हालत अत्यंत गंभीर आहे . जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी अकोला व अमरावती येथे पाठवण्यात आहे. सदर हल्ल्यात गावकऱ्यांनी शासनाच्या १५ गाड्यांची तोडफोड केली व जंगलाला मोठ्या प्रमाणात आगी लावल्या आहेत. अमरावतीच्या  जिल्हाधिकाऱ्यांनी  परिसरात (section 144) कर्फ्यू लावला  आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-24


Related Photos