मालेवाडा येथे पोलीस पाटील दिन, निवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस                 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
तालुक्यातील मालेवाडा पोलीस मदत केंद्रात पोलीस पाटील दिन व निवृत्त पोलीस पाटलांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन  होते.  महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना जिल्हा गडचिरोली तालुका शाखा कुरखेडा - कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्धघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांच्याहस्ते  करण्यात आले. 
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील संघटनेचे विदर्भ अध्यक्ष भृंगराज परशुरामकर होते.  प्रमुख अथिति म्हणून पो पा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद पा ब्राम्हणवाडे , अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे स्वाध्याय मंडळाचे प्रमुख ऋतुजा कुलकर्णी , म रा गा का महिला आघाडी जिल्हाअध्यक्ष येशोधरा नन्देश्वर , म रा गाव कामगार पो पा चे जिल्हा सचिव मुरारीरीजी दहीकर पो पा संघटना आरमोरीचे अध्यक्ष नरेंद्र बनपूरकर , पुराडा पो .स्टेशनचे पो उपनिरीक्षक गोदे , पो उपनिरीक्षक शेळके ,  मालेवाडा पो म के चे प्रभारी रामदास जाधव , पो उपनिरीक्षक संदीप जाधव  आदि  उपस्थित होते .
कार्यक्रमाला उद्धघाटक म्हणून  मार्गदर्शन करतांना उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे म्हणाले की , पोलीस पाटील हे पद गावातील प्रमुख पद आहे आपल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन गावामध्ये शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करावे . सामंजस्याने गावामध्ये न्यायनिवाडा करावा , कोणत्याही एका गटाचे नेतृत्व न करता दोन्ही बाजूंचा विचार करावा .त्याचप्रमाणे पोलीस पाटील या पदाची जबाबदारी पार गाव पातळीवर पार पाळत असताना घाईगडबडीत निर्णय न घेता अतिशय विचारपूर्वक , घटनेचे गंभीरता लक्षात घेऊन   न्यायनिवाडा करावा आपण संवेदनशील भागात काम करत असून पोलीस प्रशासना प्रती आपली भूमिका महत्वाची आहे .जनता व पोलीस यांच्या मधील दुवा म्हणजेच पोलीस पाटील पद होय .शिवाजी महाराजांच्या काळापासून व इंग्रजांच्या राजवटीतही पोलीस पाटलांची महत्वाची भूमिका होती .आजही लोकशाहीच्या काळात पोलीस पाटलाचे कर्तव्य तितकेच महत्वाचे आहे .त्यामुळे आपण एक गावातील व्यक्ती म्हणून कर्तव्यावर असताना आपली पोलीस पाटलांची भूमिका जबाबदारीने पार पाडावी असेही ते म्हणाले . 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पो पा संघटनेचे विदर्भ  अध्यक्ष भ्रूण्गराज परशुरामकर म्हणाले की , पेसा अंतर्गत गावातील कार्यरत पोलीस पाटील  पदावरुन निकामी होणार होते .मात्र आपण पोलीस पाटलांच्या वतीने णेत्रूत्व करून पोलीस पाटलांना वयाच्या साठ वर्षापर्यंत पदावर कायम ठेवण्याचा जी आर शासनाला काढण्यासाठि प्रयत्न केले असे ते म्हणाले , पोलीसानी पो पाटलांची मतप्रक्रिया विचारात घेऊन गावातील वाद वादविवाद दूर करण्यास हातभार लावावे .
 प्रमुख अतिथी म्हणून बोलताना पो पा संघटनेचे गडचिरोली  जिल्हा अध्यक्ष शरद पाटील ब्राम्हणवाडे म्हणाले की , पोलीस पाटलांनी संघटित होऊन आपल्या हक्कासाठी लढा द्यावा .आपले पद महत्वाचे असून पदाला शोभेल असेच वर्तन गावात ठेवावे .यावेळी पो उपनिरीक्षक गोदे , पो उपनिरीक्षक रामदास जाधव यांनीसुद्धा मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे  संचालन येंगलखेडा चे पो पा युवराज बावनथडे यानी तर प्रस्ताविक  तुकडोजी पा डोंगरवार यांनी केले . आभार मारोती पा .व ट्टी यानी मानले 
कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते .कार्यक्रमाला पो पा विलास चाभारे , मालेवाडाचे पो पा राकेश पा नागोशे  अंगाराचे पो पा लांजेवार सह सर्व पो पाटील उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-24


Related Photos