महत्वाच्या बातम्या

 अवैध ऑटो स्टॅन्डमुळे रहदारी ला अडथळा : ऑटो चालकाचे हुल्हाड बाजी 


- ऑटो चालकाचे पत्रकार ला मारहाण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : येथील नवीन बस स्थानक समोर अवैध ऑटो स्टॅन्ड उभारलेले आहे. मेन रोड असलेल्या ठिकाणी मेन रोड वरच ऑटो उभे केले असतात, त्यामुळे रहदारी ला अडथळा निर्माण होत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या ना नाहक त्रास होत असतात. मेन रोड वर ऑटो उभे असल्याने ऑटो मध्ये बसणारे व उतरणारे यांच्या गर्दी मुळे ट्राफिक जाम होत असते.  कोणी काही म्हटलं की त्यांना ऑटो चालक हुल्हड बाजी करून अंगावर धावून अश्लील भाषेत शिवीगाळ करतात. 


अशीच एक घटना मंगळवारी सायंकाळी घडली गणपती वॉर्ड चा रस्त्या कडून पत्रकार विशाल डुंबरे येत असताना बस स्टॅन्ड समोर अवैध ऑटो स्टॅन्ड वर मेन रोड वर काही ऑटो चालक मस्ती, हुल्हड बाजी करीत असताना ट्राफिक जाम झाले होते. रहदारी ला अडथळा निर्माण झाला असताना त्यांनी ऑटो चालकाला समोर जायला जागा द्या असे म्हटल्यावर ऑटो चालकाने विशाल डुंबेरे यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. त्यात त्यांचा चष्मा फुटले व त्यांचे शर्ट फाटले. पोलिसांना फोन करण्या करिता मोबाईल काढले असता त्यांनी फोन हातातला झटकला. मोबाईल खाली पडून फुटला तसेच पोलीस वाले माझे काहीचं बिघडू शकत नाही असे बोलून अश्लील शिवीगाळ करू लागला. त्या ठिकाणी एक ही ट्राफिक पोलीस नव्हता. बस स्थानक जवळ दिवस भर ट्राफिक जाम राहते तरी पण येथे सायंकाळी एकही ट्राफिक पोलीस हजर नसतात ही घटना ६ ते ६.३० वाजता चे दरम्यान घडली. विशाल डुंबेरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये ऑटो चालक नामक गणेश विरुद्ध तक्रार नोंदवली. पोलीस ऑटो चालकाचा शोध घेत आहे. 


अवैध ऑटो स्टॅन्ड वर अनधिकृत पने ऑटो उभे ठेवून त्यांचा कडे लायसन्स, बॅच, ऑटो चे इन्शुरन्स पण नसतात. नागरिकांची मागणी आहे की येथील अवैध ऑटो स्टॅन्ड दुसरी कडे हलविण्यात यावे, नाहीतर कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते, याचे जबाबदार कोण?असा प्रश्न निर्माण होत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos