महत्वाच्या बातम्या

 नागपूर जिल्ह्यात स्किल ऑन व्हिल ही अद्यावत प्रयोगशाळा असणारी मोबाईल व्हॅनचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : लेंड ए हॅन्ड संस्था, पुणे ही व्यवसाय शिक्षण क्षेत्रात कार्य करणारी संस्था असून शासनाच्या व्यवसाय शिक्षण योजनेसाठी तांत्रिक सहकार्य करणारी संस्था आहे. स्किल ऑन व्हिल व्हिल ची सेवा सर्व गरजू बेरोजगार उमेदवार तथा शालेय विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध होणार आहे. ही व्हॅन नागपूर जिल्ह्यात प्रशासकीय इमारत क्र. 2, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे 11 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे हस्ते होणार आहे.


शासनाच्या समग्र शिक्षा, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, आणि लेंड ए हॅन्ड संस्था यांचा सामंजस्य करार झालेला आहे. संस्थेने ‘स्किल ऑन व्हिल’ ही अद्ययावत प्रयोगशाळा असणारी मोबाईल व्हॅन तयार केली असून सदर व्हॅन ही महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशामध्ये व्यवसाय शिक्षण योजनेचे प्रचार आणि प्रसार व्हावा या अनुषंगाने संस्थेच्या मदतीने  या व्हॅनमध्ये उमेदवारांसाठी कौशल्यावर आधारित शिक्षणाचे सादरीकरण (Presentation on Skill Oriented Vocational Short Term Courses) करण्यात येणार आहे.


नागपूर जिल्ह्यातील अधिकाधिक गरजु बेरोजगार उमेदवारांनी व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र.गं.हरडे यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos