महत्वाच्या बातम्या

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बिट मार्शलला दुचाकी वाहनांचे वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वर्धा जिल्हा पोलिस दलातील ४० बीट मार्शलला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दुचाकी शासकीय वाहनांचे वितरण करण्यात आले.

या वितरण कार्यक्रमास फडणवीस यांच्यासह खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, आ. रणजित कांबळे, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समिर कुणावार, आ. दादाराव केचे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, विशेष पोलिस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नूरुल हसन उपस्थित होते.

पोलिस विभागाच्या नियंत्रण कक्षास वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असतात. काही ठिकाणी अपघात, चोरी, मारामारी तर कुठे तातडीने पोलिस मदत आवश्यक असल्याचे नियंत्रण कक्षास संदेश प्राप्त होते. अशावेळी तातडीने पोलिस मदत उपलब्ध व्हावी. याकरीता ही वाहने अतिशय उपयोगी ठरणार आहे. मदतीचे संदेश प्राप्त झाल्यानंतर काही वेळात हे बिट मार्शल या वाहनांच्या सहाय्याने घटनास्थळी दाखल होतील. याशिवाय दिवसा व रात्री गस्तीसाठी बीटमार्शलला हे वाहन अत्यंत उपयोगी पडणार आहे.

पोलिसांच्या सेवाप्रणालीचे लोकार्पण

नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करता यावी यासाठी वर्धा जिल्हा पोलिस दलाने सर्वीस एक्सलन्स ॲन्ड व्हिक्टीग असिस्टंन्स अर्थात सेवा प्रणाली विकसित केली असून या प्रणालीचे लोकार्पण देखील उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले.

पोलिस अधीक्षक कार्यालयास तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची सेवा प्रणालीमध्ये नोंद केली जाईल तसा तक्रारकर्त्यास संदेश जाईल. सदर तक्रार प्रणालीद्वारे त्याचवेळी संबंधित पोलिस स्टेशनला पाठविली जाईल. तक्रारीवर होणाऱ्या कारवाईचा संदेश वेळोवेळी तक्रारकर्त्यास पाठविला जाईल. त्यावर झालेली कारवाई पोलिस अधिक्षक कार्यालय व तक्रारकर्त्यांस व्हॉट्सॲपद्वारे पाठविली जाणार आहे. ही प्रणाली तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे.





  Print






News - Wardha




Related Photos