महत्वाच्या बातम्या

 कुनो राष्ट्रीय उद्यानातील आणखी एका चित्त्याचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणलेल्या दक्षा या मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. दक्षा या चित्त्याच्या मृत्यूचे कारण आजारपण नसून लढाई आहे.

मादी चित्ता दक्षा आणि धीराची नर चित्ता फिंडा, वायू आणि अग्नी यांच्याशी लढाई झाली. यामध्ये दक्षाने जीव गमावला, अशी माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे गेल्या तीन महिन्यांत कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्याचा मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे.

मुख्य वनसंरक्षक चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी उद्यानाच्या देखरेख पथकाला दक्षा जखमी अवस्थेत सापडली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातून २० चित्ते देशात आणून त्यांची रवानगी कुनो राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली. त्यापैकी आता केवळ १७ चित्ते शिल्लक राहिले आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos