महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटूंबियांना ॲक्सिस बँकेने दिला मदतीचा हात


गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटूंबियांना ॲक्सिस बँकेने दिला मदतीचा हात
- पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते १० लाख रुपयांचे धनादेश कुटुंबियांच्या स्वाधीन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : बँक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किंवा त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरीकांमध्ये ओळख असुन एक पाऊल पुढे जात आपल्या खातेधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्यांच्या कुटूबियांना आर्थीक आधार देण्याचा नवा आदर्श ॲक्सिस बँकेने ठेवला आहे. २५ ऑक्टोबर २०२२ रोजी गडचिरोली पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी रविंद्र तुलाराम मडावी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले. ही समस्या ओळखून ॲक्सिस बँकेने मदतीचा हात पुढे करीत त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती निलम रविंद्र मडावी व आई धुरपता तुलाराम मडावी यांना आर्थीक मदत स्वरुपात पोलीस अधीक्ष नीलोत्पल यांचे हस्ते १० लाख रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला.


यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक राकेश राजेंद्र वल्लरवार यांचे उपस्थित मृत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना धनादेश स्वाधीन करण्यात आला.





  Print






News -




Related Photos