महत्वाच्या बातम्या

 ऑनलाईन जुगार अड्ड्यावर धाड : पोलीस स्टेशन खापा यांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पोलीस स्टेशन खापा येथील स्टाफ पोलीस अधिक्षक यांचे आदेशान्वये ०६ मे २०२३ रोजी अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन खापा येथील बाजारचौक येथील नगरपरीषदेचे संकुलामध्ये काही इसम अवैध ऑनलाईन लॉटरी या प्रकारचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोलीस स्टेशन खापा येथील स्टाफला प्राप्त झाले.

माहितीनुसार सदर स्टाफ यांनी बाजारचौक खापा येथे जावुन बाजारात पाहणी केली असता नगरपरीषद संकुलातील पश्चिम बाजूस मागे गाळा नं. ०५ येथे लोकांची गर्दी दिसली. तेथे पोलीसांना पाहुन काही लोक पळु लागले. त्यांना स्टाफच्या मदतीने पकडण्यात आले. सदरचे ऑनलाईन लॉटरी सेंटर है सलीम लॉटरी सेंटर या नावाने असुन त्या ठिकाणी सापळा रचुन छापा टाकुन आरोपी १) सलीम शेख अजीज शेख (३०) रा. सावनेर २) विकास दादाराव चोखावे (२४) रा. हिंगणा ता. सावनेर ३) निलेश नारायण कुंभारे (२७) ४) रविंद्र नत्थुजी तवले (३५) रा. रायडोंगरी ५) नितीन किशोर खोरगडे (२७) ६) युवराज आनंदरावजी तिवाडे (२९) रा. वाकोडी ७) समीर मेहबुब पटेल (१९) रा. कसाईपुरा खापा ८) राज शंकर धुर्वे (२३) रा. खापा ९) रशिद शेख जाकीर शेख (२३) रा. खापा १०) मंगेश मारोती उईके (२८) रा. कोदेगाव ११) विक्की तेजराव निखार (२४) रा. खापा १२) राहुल श्रावण कुंभारे (२१) रा. खापा १३) रोशन हबीब शेख (३५) रा. खापा १४) कईम शेख ईतातउल्हा शेख (४२) रा. खापा १५) ज्ञानेश्वर सुरेश नंदनवार (२४) रा. खापा १६) गोपाल रामचंद्र खडसे (४५) रा. खापा १७) मोहन महादेव मुरड (४२) रा. खापा १८) महेमुद रज्जाक शेख (४८) रा. खापा १९) करीम रफीक शेख (३५) रा. खापा हे लोकांकडुन पैसे घेवुन ऑनलाईन मशिनवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळतांनी मिळुन आले. 

असा एकुण १९ जुगारी इसम यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन १) नगदी ३७ हजार ६०० रू. व गल्ल्यातील नगदी ५ हजार ७५७ रू. तसेच ऑनलाईन असणाऱ्या मशीन व ईतर साहीत्य किंमती अंदाजे ४३ हजार २०० रू., १६ मोबाईल किमती अंदाजे १० लाख ३ हजार रू. असा एकुण किमती अंदाजे १ लाख ८९ हजार ५५७ रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीताविरूध्द पोलीस ठाणे खापा येथे कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपीतांना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पोलीस ठाणे खापा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले परि सहायक पोलीस अधिक्षक अनिल मस्के, परि पोलीस उपअधिक्षक राहुल झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोरकर, सहायक फौजदार प्रमोद बन्सोड, पोलीस हवालदार अंकुश लाखे, पोशि अभिषेक पांडे व आरसीपी पथक ईतर पोलीस स्टेशन स्टाफ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.





  Print






News - Nagpur




Related Photos