‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मनोरंजन प्रतिनिधी / मुंबई :
“प्रत्येक व्यक्तीकडे सांगण्यासारखी एक अनोखी गोष्ट असते आणि जर तुम्हांला जगात काही बदल करायचे असल्यास तर सर्वात पहिले तुम्ही तुमची गोष्ट बदलायला हवी”... असा एक महत्त्वपूर्ण संदेश ‘अहिल्या’ या चित्रपटाच्या निमित्ताने अधोरेखित केला जाणार आहे. रेड बल्ब स्टुडियोज प्रस्तुत ‘अहिल्या’ या चित्रपटात ‘अहिल्या पाटील’ या महिला पोलिसचा ‘एक कॉन्सटेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी’ हा प्रवास दाखवण्यात येणार आहे.
श्रीधर चारी निर्मित आणि राजू पार्सेकर दिग्दर्शित-लिखित या चित्रपटात कर्तबगार आणि डॅशिंग महिला पोलिस साकारले आहे.  मेहनतीने आणि आत्मविश्वासाने आयपीएस पोलिस अधिकारी झालेल्या महत्त्वांकाक्षी ‘अहिल्या’ची अभिमानास्पद गोष्ट लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायाला मिळणार आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-01-22


Related Photos