कसनासूर चकमकीला जबाबदार धरून नक्षल्यांनी केली 'त्या' तिघांची हत्या


- घटनास्थळावर बांधले बॅनर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
२२  एप्रिल २०१८ रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर येथे झालेल्या चकमकीत ४० नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला होता. या चकमकीला जबाबदार धरून पोलिस खबरी असल्याच्या संशयातून नक्षल्यांनी तिघांची हत्या केली आहे. 
महालु दोगे मडावी (३८) , कन्ना रैनु मडावी (३०) आणि लालसु मासा कुडयेटी (४८) तिघेही रा. कसनासूर अशी मृतकांची नावे आहेत. या तिघांसह आणखी तिघांना गावातून शुक्रवारच्या रात्री १२ वाजता नक्षल्यांनी घेवून गेले. त्यांच्या यापैकी तिघांना सोडून देत तिघांची हत्या करण्यात आली.  यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आले आहेत.  त्यांचे मृतदेह आज २२ जानेवारी रोजी कोसफुंडी फाट्याजवळ आढळून आले.    नक्षल्यांनी घटनास्थळावर बॅनर बांधले असून ४० नक्षल्यांच्या मृत्यूला हे तिघे जबाबदार असल्याचे नमुद केले आहे. 
नक्षल्यांनी सहा जणांना घेवून गेल्यानंतर गावकरी प्रचंड दहशतीत होते. सर्व महिला, पुरूष, बालके ताडगाव पोलिस मदत केंद्रात कालपासूनच गोळा झाले आहेत. ताडगाव पोलिस मदत केंद्रात या नागरीकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. नागरीक प्रचंड दहशतीत आहेत. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-22


Related Photos