महत्वाच्या बातम्या

 कुडेसावली येथे युवा शिबीर संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली येथे ८ मे ला बुद्ध जयंती निमित्य युवा शिबीर चे आयोजन करण्यात आले होते.

युवकात आंबेडकरी चळवळ आणि धम्म रुजावा हा हेतू ठेवून या शिबिराचे आयोजन केले होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले धम्ममित्र भास्कर भगत यानी दोन सत्रात मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात त्यांनी आंबेडकरी चळवळ म्हणजे काय याचे विवेचन केले आणि युवकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली व दुसऱ्या सत्रात धम्माचे आपल्या जीवनात काय महत्व आहे? याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी धम्ममित्र भीमराव नारनवरे यांनी म. फुले यांचे जीवनातील प्रसंगांचा आधार घेत जाति व्यवस्थेवर प्रकाश टाकला. डॉ. प्रकाश तोहोगावकर यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले. प्रस्ताविक आणि आभार प्रदर्शन राजेश डोडीवार यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos