महत्वाच्या बातम्या

 गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अशासकीय संस्थांनी प्रस्ताव सादर करावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य आहे. दरवर्षी साठवत असलेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. शासनामार्फत धरणामधील गाळ काढून शेतामध्ये वापरण्याकरिता गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हि योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व धरणांमधील गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनःस्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात वाढ देखील होईल. सर्व जलस्त्रोतात गाळ साठणे हि क्रिया कायमस्वरूपी असल्याने या योजना राज्यात तीन वर्षापर्यंत मर्यादित न राहता कायमस्वरुपी राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

या योजनेत जिल्ह्यातील सर्व अशासकीय संस्थांच्या सहभागाणे त्याच्याकडील यंत्रसामुग्रीमार्फत धरणातील गाळ काढुन तो शेतात पसरवुन शेतजमीनीची सुपीकता वाढविणे हे या योजनेचे ध्येय आहे. या मध्ये अल्प व अत्यल्पभुधारक अपंग, आत्महत्याग्रस्त व विधवा महिला शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये गाळ काढुन तो शेतापर्यंत पोहोचविणे व शेतात पसरविणे या करिता अशासकीय संस्थांना अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल.

योजनेत सहभागी होणाऱ्या अशासकीय संस्थायांना यंत्रसामुग्री व इंधनावरील खर्च कार्योत्तरप्रदान करण्यात येईल. गाळ वाहून नेण्यासाठी अल्प व अत्यल्पभुधारक अपंग, आत्महत्याग्रस्त व विधवा महिला शेतकरी यांना अनुदान देय राहील. हे अनुदान फक्त २.५० एकर पर्यंत अधिकाधिक देय राहील.

योजनेत सहभाग नोंदविण्याकरिता अशासकीय संस्थायांनी आपला प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे सादर करावा, असे जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी अनंत जगताप यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos