महत्वाच्या बातम्या

 जीवाची होतिया काहिली मालिकेत दिवाळी साजरी


- पहा जिवाची होतिया काहिली सोम. ते शनि. संध्या. 7.30 वा. सोनी मराठी वाहिनीवर

विदर्भ न्युज एक्सप्रेस 

मनोरंजन प्रतिनिधी /  मुंबई  : सोनी मराठी वाहिनी सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यग्र आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या जिवाची होतिया काहिली या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. मराठी आणि कानडी भाषिक प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसत आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांचा लाडका, कोल्हापूरचा रांगडा गडी अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवलकर हीच कानडी अंदाज सुद्धा  प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. नुकतेच मालिकेत यक्षगान पार पडले. त्यात अर्जुन ने रावणाची भूमिका केली आहे. अर्जुन रेवतीच्या प्रेमात पडला असून रेवती ने देखील मैत्रीचा हात पुढे केला आहे आणि मालिका वेगळे वळण घेत असून. दिवाळीत मालिकेत नवे वळण दिसणार आहे. दिवाळी निमित्त अर्जुन रेवती यांचा वेगळा लुक पाहायला मिळतो आहे आणि यांच्या गोष्टीला काय नवीन वळण असेल हे पाहणे उत्सुकतेचा ठरणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos