महत्वाच्या बातम्या

 कृषि विभागामार्फत सर्व शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलबाबत सूचना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : सद्यस्थितीत सोशल मीडियामार्फत महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची व सोडत १५ मे २०२३ पर्यंत असल्याचे तसेच १५ मे २०२३ नंतर जवळपास २ ते ३ महिने ऑनलाइन शेतकरी निवड सोडत होणार नाही, अशा आशयाचे संदेश/माहिती अज्ञाताने विविध सामाज माध्यमांवरप्रसारित केलेले आहेत.

तरी महाडीबीटी पोर्टल संदर्भात अशाप्रकारचा कोणताही संदेश/माहिती कृषि विभागामार्फत देण्यात आलेली नाही, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. महाडीबीटी पोर्टल या संगणकीय ऑनलाईन प्रणालीवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असुन सदर अर्ज केलेल्या घटकांची सोडतशेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांनुसार व आवश्यकतेनुसार दर आठवड्याला काढण्यात येत आहे. तरी https://mahadbt.maharashtra.gov.in/ शेतकरी य़ोजना या सदराखाली जाऊन विविध लाभाच्या घटकांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात येत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos