महत्वाच्या बातम्या

 लाड़बोरीच्या नदीपात्रातून रेती तस्करी : महसूल विभागाचे दुर्लक्ष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील लाड़बोरी गावाच्या जवळ वाहणाऱ्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असून महसूल विभागाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. नदीपात्रातून रेती तस्करीचा खेळ रात्रीच्या वेळेस चालतो, अशी चर्चा आहे.

सदर अवैध रेती वाहतुकीने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल अधिकारी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असून सदर नदीपात्रातून रेती उत्खनन सुरू आहे.

सदर रेती तस्करी रोखण्यासाठी संबधित विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. आणि या तस्करीवर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांनी उपाययोजना करून ही तस्करी बंद करावी, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos