dycommr.enf@gmail.com या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदविण्याची सोय केली आहे, याची सर्व खाजगी बस वाहतूकदार आणि प्रवाशांनी नोंद घ्यावी , असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (शहर) यांनी कळविले आहे.


" /> dycommr.enf@gmail.com या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदविण्याची सोय केली आहे, याची सर्व खाजगी बस वाहतूकदार आणि प्रवाशांनी नोंद घ्यावी , असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (शहर) यांनी कळविले आहे.


"/>
महत्वाच्या बातम्या

 निर्धारित दरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास  कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : दिवाळी सणानिमित्त प्रवासी मोठ्या प्रमाणात गावी येत व जात असतात. यादरम्यान प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारल्याबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होतात. या पार्श्वभूमीवर खाजगी वाहतूकदारांनी निर्धारित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास वाहतूकदारांवर मोटार वाहन कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गातील संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती कि.मी. भाडे दराच्या ५० टक्के पेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाने निश्चित केले आहेत.
सर्व खाजगी बस वाहतूकदारांनी आपली खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणापासूनचे कि.मी. प्रमाणे खाजगी बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भाडे बाबतचा विहीत नमुन्यात तक्ता तयार करून व त्याप्रमाणे येणारा प्रती आसन दर दर्शवून खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी बस वाहतूकदारांच्या बुकिंग कार्यालयाच्या बाहेरील दर्शनी भागी प्रवाशांना सहजपणे दिसेल अशाप्रकारे प्रसिध्द करावा आणि प्रवाश्यांकडून शासन निर्णयाप्रमाणे भाडे आकारावे.
प्रवाश्यांना प्रवास करतांना येणाऱ्या अडचणीबाबत dycommr.enf@gmail.com या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदविण्याची सोय केली आहे, याची सर्व खाजगी बस वाहतूकदार आणि प्रवाशांनी नोंद घ्यावी , असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (शहर) यांनी कळविले आहे.






  Print






News - Nagpur




Related Photos