महत्वाच्या बातम्या

 जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद : पोलिस स्टेशन केळवदची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पो.स्टे. केळवद येथील स्टाफ पोस्टे परिसरात ०६ मे २०२३ रोजी पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली की, मौजा खुर्सीपार ते सावळी फाटा येथून एका पाया रंगाची पिकअप गाडी मध्ये विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कॉवुन वाहतुक करीत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार केळवद पोलीस पथक तात्काळ मौजा खुसपार ते सावळी फाटा येथे गेले असता तेथे एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाड़ी येतांना दिसली त्यास थांबण्याचा इशारा केला, असता पोलिसांना गणवेशात पाहुन पिकअप चालक याने पोलीसांनी लावलेल्या नाकाबंदीचे ठिकाणी वेगाने वाहन चालवुन वाहन चालक याचा पाठलाग करुन वाहनास धावविले. असता आरोपी हा अंधाराचा फायदा घेउन घटनास्थळाहुन वाहन सोडुन पळून गेला. 

घटनास्थळी यातील पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी क्र. एमएच ४९ ए टी ९३६०१ वा चालक याने आपल्या ताब्यातील वाहनात १) ८ नग जिवंत गाई गोवंश प्रत्येकी किमती १० हजार प्रमाणे किमती ८० हजार रुपये २) १ नग मृत गाई गौवंश प्रत्येकी रुपये ३) पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी क्र. एम. एच. ४९ ए.टी.- ९३६१ किमती ७ लाख  रुपये मध्ये जनावरे अत्यंत क्रूर व निर्दयतेने डाडुन आखुड दोरीने बांधुन त्यांना चारा पाण्याची सोय न करता कोवुन दाटीवाटीने अपुऱ्या जागेत ठेवून कत्तली करीता वाहतुक करताना मिळून आले. आरोपीकडून वाहनासह असा एकूण किंमती ७ लाख ८० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणी सरकार तर्फे पोशि/ २३३९ सचिन भगवान खेळकर (३१) वर्ष रा. पो.स्टे. केळवद जि. नागपूर ग्रा यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. केळवद येथे आरोपीविरुद्ध कलम २७९ ४२९ भादवि सह कलम १२ (२) (घ) (द) (च) प्राण्यांना निर्दयतेने वागणुक प्रतीबंधक अधि. १९६० सहकलम ५ (अ), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनीयम १९९५ सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनीयम सहकलम १८४ मोवाका काहायान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील आरोपींचा शोध घेणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास सफी किशोर ठाकरे व नं १५४७ मोन ८००७४९२६५६ हे करीत आहे.

सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिपपखाले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन केळवद येथील ठाणेदार अमितकुमार आत्राम, सहायक फौजदार किशोर ठाकरे, पोलीस नायक दीपक इंगळे, सचिन बेरकर, श्रीधर कुलकर्णी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.





  Print






News - Nagpur




Related Photos