महत्वाच्या बातम्या

 नमाद महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेवर परिसंवाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : स्पर्धा परीक्षेची तयारी करवून घेणारी पुणे येथील द युनिक अकादमी आणि येथील गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविधालयाच्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पदवी काळात स्पर्धा परिक्षांची तयारी कशी करावी या विषयावर नुकताच ऑनलाईन परिसंवाद आयोजित करण्यात आला.

गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन व संचालक निखील जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तथा प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात आभासी मंचावर झालेल्या परिसवांदाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शारदा महाजन होत्या. मार्गदर्शक म्हणून द युनिक अकादमी पुणेचे  तज्ञ मार्गदर्शक दिनेश ताठे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अंबादास बाकरे उपस्थित होते.

यावेळी युनिक अकादमीचे दिनेश ताठे म्हणाले, स्पर्धा हे २१ व्या शतकातील युवकांसमोर असलेले सर्वात मोठे आव्हान आहे. आज जगातील प्रत्येक क्षेत्रात वाढत चाललेली स्पर्धा युवकांमध्ये जिज्ञासा आणि निराशा असे दोन्ही पैलू निर्माण करित आहे. यातील जिज्ञासा ही युवकांमध्ये शिकण्याची तसेच नवे आव्हान पेलण्याची क्षमता निर्माण करते. तेव्हा आपण विद्यार्थी दशेतच स्वतःमध्ये जिज्ञासा निर्मिती करणाऱ्या स्पर्धा परिक्षांना सामोरे जाण्याची तयारी करावी. यासाठी पदवी शिकतानाच महाविद्यालयीन जीवनाचा काळ हा सर्वात पोषक असतो. या काळाचा ज्यांनी उपयोग केला तो नक्कीच यशस्वी होतो. त्यामुळे विध्यार्थ्यानी महाविद्यालयीन जीवनाचा सदुपयोग करावा, असे आवाहन ताठे यांनी केले. सोबतच त्यांनी स्पर्धा परिक्षांचे स्वरूप त्यासाठीची पात्रता, अध्ययन प्रणाली या महत्वपूर्ण विषयांवर  महत्वपूर्ण  मार्गदर्शन केले. विध्यार्थ्यानी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे सुद्धा ताठे यांनी दिली.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. संतोष होतचंदानी यांनी केले. प्रास्ताविक डॉ. अंबादास बाकरे तर वक्त्यांचा परिचय डॉ. खुशबु  होतचंदानी यांनी करून दिला.  आभार डॉ. रविंद्र मोहतुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. योगराजसिंह बैस, डॉ. मुनेश ठाकरे, डॉ. सरिता उदापूरकर, डॉ. अर्चना जैन, प्रा. घनशाम गेडेकर, प्रा. योगेश भोयर यांनी प्रयत्न केले. परिसंवादाला महाविद्यालयातील बहुसंख्य विधार्थी सहभागी झाले होते.





  Print






News - Gondia




Related Photos