महत्वाच्या बातम्या

 कुनघाडा (रै.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ पदे रिक्त 


- आरोग्य सेवा अस्थिपंजर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा  (रै.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तब्बल १६ पदे रिक्त असल्यामुळे  येथील आरोग्य सेवा अस्थिपंजर झाली आहे.

चामोर्शी तालुक्यात कुनघाडा  (रै.) हे गाव लोकसंख्येने व विस्ताराने बरेच मोठे असून, राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण गाव म्हणून ओळखले जाते. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून कुनघाडा  (रै.) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत असून केंद्रांतर्गत स्थानिक कुनघाडा  (रै.), तळोधी मो, नवेगाव  (रै.), गिलगाव जमी, कुथेगाव, नवरगाव, भाडभिडी मो, मुरमुरी, येडानुर, पावीमुरांडा इत्यादी ११ उपकेंद्र व ४२ गावांचा समावेश आहे. 

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाल्यामुळे २०१८ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ४ कोटी ४८ लाख ९० हजार रुपये एवढा निधी खर्च करून नवीन व दुमजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. याच आरोग्य केंद्रातून ११ उपकेंद्र व ४२ गावांना आरोग्य सेवा दिली जाते  मात्र तब्बल १६ पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असल्यामुळे येथील आरोग्य सेवा अस्थिपंजर झाली आहे रिक्त पदे भरण्याबाबत आरोग्य विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला मात्र आरोग्य विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभागप्रति रोष व्यक्त केला आहे. 

अशी आहेत रिक्त पदे

प्राथमिक आरोग्य केंद्र कुनघाडा (रै.) येथे २ आरोग्य सेविका, १ आरोग्य सेवक व १ औषध निर्माण अधिकारी पद रिक्त, उपकेंद्र नवरगाव येथे १ आरोग्य सेविकेचे पद रिक्त, उपकेंद्र गिलगाव जमी येथे १ आरोग्य सेवक पद रिक्त, उपकेंद्र नवेगाव (रै.) येथे १ आरोग्य सेवक पद रिक्त, उपकेंद्र तळोधी मो येथे १ आरोग्य सेविकेचे पद रिक्त, उपकेंद्र भाडभिडी मो येथे १ आरोग्य सेवकाचे पद रिक्त, उपकेंद्र मुरमुरी २ आरोग्य सेवक व २ आरोग्य सेविकेचे पद रिक्त, उपकेंद्र येडानुर येथे १ आरोग्य सेवक पद रिक्त, उपकेंद्र पावीमुरांडा येथे १ आरोग्य सेविका व आरोग्य पथकात वैद्यकीय अधिकारी गट अ चे १ पद रिक्त असे एकुण १६ पदे कुनघाडा (रै.) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रिक्त आहेत. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos