महत्वाच्या बातम्या

 बुद्ध पौर्णिमेला गुरवळा नेचर सफारीमध्ये ३९ पर्यंटकांनी घेतला प्राणी निरीक्षणाचा आनंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली नजीकच्या गुरवळा नेचर सफारी परिसरात गडचिरोली वनविभागातर्फे बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून ५ व ६ मे रोजी पर्यटकांसाठी मचाणवर निसर्ग अनुभव व प्राणी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या ३९ जणांनी मचाणावर बसून प्राणी निरीक्षणाचा आनंद घेतला.

गुरवळा नेचर सफारीमध्ये प्राणी निरीक्षणाचा कार्यक्रम गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, उप वनसरंक्षक मिलिश शर्मा, सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनाखाली व धिरज ढेंबरे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नेतृत्वात राबविण्यात आला होता. या उपक्रमात सहभागी पर्यटकांना रात्रीच्या प्रकाशात मचानवर बसून अस्वल, राणकुत्रे, रानडुक्कर, बिबट, चितळ, नीलगाय, चौसिंगा, कोल्हा, ससा आदी वन्यप्राण्यांचे दर्शन घेऊन प्राणी निरीक्षणाचा रोमांचकारी अनुभव, जंगलातील शांतता व पक्षांचा किलबिलाट जवळुन बघता आला.

प्राणी निरीक्षणाचा विनोदकुमार नवघरे, विजयघुग्गुरकर, मधुर हेमके, शशिकांत बद्देल, लोमेश मेश्राम, विनय साळवे, संतोष बेहरे, मनीष उत्तरवार, विजय साळवे, साक्षी साळवे, सुनीता साळवे, प्रतीक्षा साळवे, महेश कोट्टावार, माही कोट्टावार, स्पर्श कोट्टावार, सचिन मुन, आशुतोष कोरडे, रुपम गावडे, अमोल मानकर, निखिल मेश्राम, रजनीश वालदे, कोमल चुनारकर,अनिलकुमार धामोडे, गायत्री सोमणकर, मनीषा महात्मे, संद्या येळेकर, अरुणा गोहणे, डॉ. विणा जांबेवार, शुषमा मडावी, विजया माने, सुलभा धामोडे, सुनीता साळवे, विवेक मुन, ग्रिश्मा विवेक मुन यांनी मनसोक्त आनंद घेत समाधान व्यक्त केला आहे. 

सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी धिरज ढेंबरे, क्षेत्रसहाय्यक गुरवळा विजय जनबंधू, गुरु वाढई वनरक्षक गुरवळा, धर्मराव दुर्गमवार वनरक्षक येवली, दादाराव ऊईके, संजु मुरार, विलास भोयर, प्रभाकर निकुरे, रमेश मेश्राम अध्यक्ष सयुक वन व्यवस्थापन समिती हिरापूर, प्रदीप मेश्राम अध्यक्ष सयुक वन व्यवस्थापन समिती गुरवळा तसेच गुरखळा नेचर सफारी येथील गाईड अतुल नेंचलवार, लंकेश गेडाम, गिरीधर मेश्राम, गजानन तुंकलवार, आशिष बर्लावार, दिपक तुंकलवार, ज्ञानेश्वर सावसागडे, लोमेश निकुरे, मोतीराम गोटा, कमलेश निकुरे यांनी सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos