तीन बैलांचा नाल्यात बुडून मृत्यू : राजुरा तालुक्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / विरुर स्टेशन :
बैलगाडी जुंपून असलेले बैल बुजाडून नाल्यात गेल्याने तीन बैलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना राजुरा तालुक्यातील धानोरा येथील सिंधी नाल्याजवळ घडली. पुंडलिक गिरसावळे रा. धानोरा असे बैल मालकाचे नाव आहे.
बैल गाडीला जुंपलेल्या दोन बैलां व्यतिरिक्त तीन बैल मागे बांधलेले होते. गिरसावळे हे बैलांना पाणी पाजण्यासाठी नाल्याजवळ थांबले. यावेळी अचानक रानटी डुक्करांचा कळप आला. यामुळे बैल बुजाडले आणि बैल गाडीसह नाल्यात कोसळले. गिरसावळे यांना पोहता येत असल्यामुळे ते बचावले. तसेच त्यांनी दोन बैलांना वाचविले. मात्र मागे बांधलेल्या तीन बैलांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक वडतकर ,  पशुधन कर्मचारी राठोड , बेहरे मेजर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-20


Related Photos