महत्वाच्या बातम्या

 युवारंग च्या समर कॅम्पमध्ये वन्यजीव जनजागृती कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : युवारंग आरमोरी यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यासाठी निःशुल्क समर कॅम्प शिबिराचे आयोजन २६ एप्रिल २०२३ ते १४ मे २०२३ पर्यंत करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आज वन्यजीव बचाव या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आरमोरी तालुक्यात सातत्याने मागील ३० वर्षांपासून साप, पक्षी व पक्ष्यांना जीवनदान देणाऱ्या वृक्षवल्ली वन्यजीवन संरक्षण संस्था आरमोरी चे अध्यक्ष देवानंद दुमाने यांना बोलवण्यात आले होते.

पशू, पक्षी, साप, वाघ या वन्यजीवावर  मार्गदर्शन करण्यात आले. सुरुवातीला आपल्या आजूबाजूच्या परिसरात आढळणारे पक्षी चिमणी, कावळे, बगळे यांचे निसर्गातील महत्व पटवून त्यांना वाचविणे का गरजेचे आहे. याची माहिती देण्यात आली. काही पक्षी जसे गिधाड पक्षी, घार जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ज्या पक्षांना स्वच्छतादुत म्हणून ओळखले जात असायचे जे मृत जनावराचे मांस काही तासात फस्त करून रोगराईस आळा घालण्याचे काम करीत असत त्याची संख्या कमी झाल्याने भविष्यातील पिढीला फोटोतून या पक्षाचे दर्शन करावे. लागतील अशी चिंता व्यक्त करण्यात आली. पक्ष्याचे महत्त्व अनन्यसाधारण असून फुलांचे पर-परागिकरण घडविण्याचे काम करीत असतात तसेच काही झाडाचे बीज जाड  कवच असल्याने पक्ष्यांच्या पोटात ते विरघळतात व विष्ठेतून बाहेर पडून उगवतात त्यामुळे पक्षी बीज प्रसाराचे काम करतात.

भारतात आढळणारा वाघ बेंगाल टायगर असून वाघाचे शरीर लाल, पिवळ्या रंगाचे असते व त्याच्या शरीरावर काळ्या धारा बनलेल्या असतात. त्यांचे वसतीस्थान पावसाळी जंगले, गवतमय प्रदेश,दलदली प्रदेशात आढळून येतात.वाघ सुमारे २५ वर्ष जगू शकतो. वाघ हा मांजरीच्या जातीतील जगातील सर्वात मोठी प्रजाती आहे. तसेच वाघ दिसल्यास वाघापासून आपला बचाव कसा केला पाहिजे याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

भारतात आढळून येणाऱ्या सापाच्या विविध जाती विषारी, बिनविषारी, निमविषारी यांची माहिती विद्यार्थ्यांना फोटोच्या माध्यमातून देण्यात आली भारतात आढळून येणाऱ्या सापाच्या जातींपैकी ८५% साप पूर्णपणे बिनविषारी असून केवळ १५% सापच विषारी आहेत त्यातही काही साप अत्यंत दुर्मिळ आहेत. सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार काय करावे आणि काय करू नये जेणे करुन रुग्णाचे प्राण वाचविता येईल.साप घराजवळ येऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, अशा याविषयी सविस्तर मार्गदर्शन वृक्षवल्ली वन्यजीवन संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाने यांनी केले. यावेळी युवारंग क्लबचे उपाध्यक्ष मनोज गेडाम, संयोजक रोहित बावनकर, सदस्य लीलाधर मेश्राम, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos