महत्वाच्या बातम्या

 आजचा विद्यार्थी आजचा नागरिक : अभाविप विदर्भ प्रदेश मंत्री शक्ती केराम यांचे प्रतिपादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : युवा चेतना २०२३ व्यक्तिमत्त्व विकास शिबिर अभाविप शाखा कुरखेडा च्या वतीने एक दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबीर घेण्यात आले. या शिबिराची सांगता वंदे मातरम नी करण्यात आली. उद्घाटन सत्राला उद्घाटक म्हणून सुरेंद्र सिंग चंदेल अभाविप कुरखेडा नगराध्यक्ष प्राध्यापक शिवणकर भाग संयोजक हिरालाल नरोटी उपस्थित होते.

वेगवेगळ्या सत्राद्वारे वेगवेगळ्या वक्त्यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्त्व विकास आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कुरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी स्पर्धा परीक्षा बद्दल सखोल माहिती विविध उदाहरणाच्या द्वारे देऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले तर तर विद्यार्थ्यांचे  व्यक्तिमत्व कसे असावे व आपण आपले व्यक्तिमत्व कसे घडवू शकतो. याबद्दल कुरखेडा वस्तीगृहाचे गृहपाल नरताम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताचे प्रांत मंत्री यांनी एकूण देशभरामध्ये विद्यार्थी परिषदेचे चालू असलेला काम विद्यार्थी परिषद हे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे छात्र संघटन कसे झाले. याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आज तळागाळातल्या संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे व विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन आवाज कशी उठवत आहे इतकेच नव्हे तर विद्यार्थी परिषदच सेवा कार्य व विद्यार्थी परिषदच्या विविध आयाम सांगत असताना आजचा विद्यार्थी हा आजचा नागरिक आहे. आजचा विद्यार्थी घडला तर समाज घडला समाज घडला म्हणजे देश घडला आणि विद्यार्थी परिषदेचा उद्देश आहे. या समाजामध्ये आदर्श विद्यार्थी चळवळ उभी करणे आदर्श विद्यार्थी आदर्श नागरिक घडवणे जे या की केवळ विद्यार्थी परिषद सारखेच एकमेव राष्ट्रभक्त संघटन हे करू शकते तर शिक्षा जीवन के लिये जीवन देश के लिये या भावनेने घेतलेली शिक्षा नक्कीच भारताला परम वैभव प्राप्त करून देऊ शकते असेही शक्ती केराम म्हणाले.

एकूण विद्यार्थी परिषदेची ओळख करून देताना कोरोना काळामध्ये विद्यार्थी परिषदेने केलेले सेवा कार्य विद्यार्थ्यांसमोर समाजाप्रती आत्मीयता आणि देशावरती स्वाभिमान असावा असे त्यांनी आपल्या या उदाहरणातून सांगितले विद्यार्थी परिषद केवळ आंदोलनच करत नाहीत तर समस्येवर सोल्युशन सुद्धा विद्यार्थी परिषदेचे देते इतकेच नव्हे तर आज समाजामध्ये महिला वर होत असलेलं अत्याचार थांबावे महिला स्वतःच रक्षण स्वतः कसे करतील साठी म्हणून विद्यार्थी परिषदेने मिशन साहसी सारखे जे उपक्रम सुरू केले आहेत. त्या उपक्रमांतर्गत सुद्धा या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःच्या रक्षणासाठी चे धडे देण्यात आले. सोबतच महिला सक्षमीकरण या विषयावर सुद्धा मार्गदर्शन या शिबिरामध्ये करण्यात आले. 

यावेळी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे संचालन अक्षय काळबांडे खुशाल पिंपळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नगर मंत्री प्रयाग बनसोड यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओमप्रकाश तरार वैष्णवी दरवडे टीना बनसोड घाटबांधे सर मेहनत घेतली व यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos