अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू : मारेगाव तालुक्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मारेगांव : अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू झाल्याची घटना तालुका मुख्यालयापासून २ किमी अंतरावर असलेल्या वृंदावन हॉटेल जवळ काल पहाटे ५. ३० वाजताच्या सुमारास घडली. अंदाजे मृतक ३० वर्षीय असून त्याची ओळख पटविण्याचे कार्य सुरु होते.
वृंदावन हॉटेल जवळ अज्ञान वाहनाने इसमाला धडक देऊन पसार झाला . अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून जखमी इसमाला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्याने इसमाला मृत घोषित केले. याबात अज्ञान वाहन चालक विरुद्ध भ. २७९.३०४ (अ) गुन्हे दाखल केला असून पुढील तपास मारेगांव स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिलीप वळगांवकर व पोलीस कर्मचारी निलेश वाढई करीत आहेत.
News - Rajy | Posted : 2019-01-20