ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथील सफाईकामगारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक करा


-  रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला रुग्णालय बंद ठेवण्याचा निर्णय 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील सफाईकामगार यांच्यावर १९ जानेवारी रोजी रात्री च्या सुमारास एका  रुग्णाच्या नातेवाईकांनी प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.  सदर घटनेचा निषेध म्हणून ग्रामीण रुग्णालय बंद करून आरोपीला अटक करण्याची मागणी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे . 
मुरलीधर राधेशाम दिवटे असे जखमी सफाई कामगारांचे नाव असून वैद्यकीय अधिकारी यांचा राउंड सुरु असतांना दिवटे यांनी आपले कर्तव्य बजावत रुग्णाच्या नातेवाईकांना वार्डातून बाहेर काढले असता रुग्णाच्या नातेवाईकाने दिवटे यांच्यासोबत बाचाबाची करून त्यांना 'मी बघून घेईन' अशा शब्दात धमकी दिली.  
मुरलीधर दिवटे आपले कर्तव्य बजावून घरी जात असताना रुग्णाच्या नातेवाईकांनी  व  त्यांच्या साथीदारानी कट रचून काल रात्री ८ वाजताच्या सुमारास  लाखांदूर टी- पॉईंट च्या जवळपास प्राणघातक हल्ला केला व त्यात मुरलीधर दिवटे गंभीर जखमी झाले . त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना गंभीर अवस्थेत तात्काळ ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्यांची प्रकृति गंभीर आहे . याबाबत देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलीस करीत आहे. या संपूर्ण घटनेमुळे रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. 
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत अशा प्रकारचे वाद वारंवार रुग्णाचे नातेवाईक करीत असतात, परंतु अशा प्रकारचे वाद व प्राणघातक हल्ला समोर कोणत्याही कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी भयभीत झाले आहेत . या सर्व घटनेचा निषेध म्हणून व जोपर्यंत आरोपीला अटक करून कारवाई करीत नाही.  तो पर्यंत ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथील सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी रुग्णालयीन कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्याचा  निर्णय घेतला आहे .   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-20


Related Photos