महत्वाच्या बातम्या

 अहेरी येथे विर बाबुराव शेडमाके शहिद दिन साजरा  


- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांची प्रमुख उपस्थिती 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी येथे विर बाबुराव शेडमाके शहिद दिन साजरा करण्यात आला. विर बाबुराव शेडमाके यांच्या १६४ व्या शहीद दिना निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम उपस्थित होते. 

राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते शहीद वीर बाबुराव शेडमाके चौकात नवीन नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्यांनतर अहेरी शहराच्या मुख्य मार्गाने निघालेल्या रैलीत स्वतः राजे यांनी सहभाग घेतला. त्यानंतर मुख्य चौकातील शहीद स्मारकाचे पूजनही राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अहेरी परिसरातील आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos