आदिवासी विकास राज्यमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची अमरावती वडाळी येथील बांबू वन उद्यानाला सदिच्छा भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गडचिरोली :
आदिवासी विकास तथा वने  राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे  पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी  १८ जानेवारी  रोजी  अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यात वेळात वेळ काढून वडाळी येथील बांबू उद्यानाला सदिच्छा भेट दिली. 
बांबू या वनस्पतीच्या जगभरातील विविध प्रजातींचे संकलन, संवर्धन व त्यावर संशोधन करून नागरिकांना बांबू या वनस्पतीचे दैनंदिन वापरातील महत्व या ठिकाणी पटवून दिले जाते. सय्यद सलीम यांनी बांबू उद्यान प्रकल्पाच्या संदर्भात तर किशोर राऊत यांनी कॅक्ट्स उद्याना संदर्भात सम्पूर्ण माहिती तसेच प्रक्रिया मंत्रीमहोदयांना दिली. 
राज्यमंत्री महोदयांनी वृक्षारोपणन करून बांबू वन उद्यानाची भेट घेण्यास सुरुवात केली. मंत्री महोदयांनी उद्यानातील बांबूच्या प्रत्येक प्रजातीच्या संदर्भात माहिती घेतली आणि देश विदेशातील बांबू संशोधनात काय प्रगती आहे याची विचारपूस करून परदेशातील त्यांनी भेट दिलेल्या बांबू प्रकल्पांच्या विशेष बाबी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्याचप्रमाणे बांबू या वनस्पती पासून रोजगाराभिमुख बाबींचा तपशिलवार आढावा घेतला.  तसेच बांबू व्यवसायसंबंधित तरुणांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्याचे आदेश दिले.
मंत्री महोदयांनी बांबू वन उद्यानातच स्थित राज्यातील एकमेव कॅक्टस संशोधन व संवर्धन केंद्रालाही भेट दिली. किशोर राऊत यांनी मंत्री महोदयांना उद्यानात असलेल्या कॅक्टसच्या देश - विदेशातील विविध प्रजातीची माहिती दिली. कॅक्टस सारख्या बहुपयोगी वनस्पतींचे उद्यान राज्याच्या विविध वन परिक्षेत्रांमध्ये कसे बनविता येईल आणि त्यातून रोजगार निर्मीती सोबतच स्थानिकांना कॅक्टसच्या औषधी उपयोगांची माहिती देण्याचे नियोजन करण्यास सांगितले.
मंत्री महोदयांनी एकंदरीत उद्यानाच्या कामा बद्दल आनंद व्यक्त केला. अश्याप्रकारे काम करण्यासाठी काही लोकांना प्रशिक्षण देऊन प्रोत्साहित करण्यासंदर्भात सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जेणेकरून अश्या लोकोपयोगी प्रकल्पांच्या माध्यमातून वन परिक्षेत्रातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामासाठी चालना मिळेल आणि सामान्य लोकांना वन विभागा अंतर्गत चालत असलेल्या कामांची माहिती मिळेल व त्याची उपयोगीताही लक्षात येईल, असा मानस त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे राज्यातील इतर वन परिक्षेत्रांमध्ये कश्या प्रकारे काम चाललेलं आहे. यावरही काही प्रमुख बाबींवर सुचनात्मक आदेश दिले.
यावेळी जिल्हा वन अधिकारी गजेंद्र नरोवणे, वन विभागाचे स्थानिक अधिकारी कैलास भुम्बर, प्रफुल फरतोडे, पोलीस यंत्रणा सोबतच वन विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-20


Related Photos