सर्व विरोधक एकत्र आल्याचे श्रेय भाजपाच्या विकासकार्याला : नितीन गडकरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
 पश्चिम बंगालमध्ये सर्व विरोधक एकत्र आल्याचे जे चित्र दिसत आहे त्याचे श्रेय भाजपाच्या विकासकार्याला आहे. या  सर्वपक्षीय महाआघाडीचा किंगमेकर भाजपच आहे, असा टोला  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला.
अनुसूचित जाती मोर्चाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन काल शनिवारी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह परिसरात आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोद, राम माधव, विजय सोनकर शास्त्री, मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद सोनकर, व्ही सतीश. दुष्यंत गौतम, अर्जुनदास मेघवाल आदी केंद्रीय मंत्री व मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, भाजप हा माय लेकाचा पक्ष नाही. राष्ट्रवाद हा पक्षाचा खरा आत्मा आहे. गेल्या ६० वर्षांत जे पूर्वीच्या सरकाराला जमले नाही, ते आम्ही साडेचार वर्षांत करून दाखवले आहे तुलनाच करायची असेल तर त्यांनी खऱ्या अर्थाने आमच्या कामाचे ऑडिट करावे. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जातीपातीपासून मुक्त राहून  पुन्हा २०१९ मध्ये नरेंद्र मोदी सरकार आणण्याचा संकल्प घ्यावा, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.   Print


News - Nagpur | Posted : 2019-01-20


Related Photos