लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४४ जागांवर एकमत


वृत्तसंस्था / मुंबई :  आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीच्या माध्यमातून राज्यातील ४८ पैकी ४४ जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे. उर्वरित ४ जागांबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. 
आघाडीत शेतकरी संघटना, सीपीएम, समाजवादी पार्टी, प्रकाश आंबेडकर आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या सहभागाबाबतही सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.   ‘निर्धार परिवर्तन यात्रे’निमित्त राष्ट्रवादीचे नेते जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सांगितले की, राज्य व देशातील भाजप व शिवसेनेच्या युती सरकारच्या कार्यपद्धतीबाबत सर्वसामान्य जनतेत प्रचंड रोष आहे. त्याचा आढावा आम्ही निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त घेत आहोत.    Print


News - Rajy | Posted : 2019-01-20


Related Photos