'खेलो इंडिया' युवा स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवत महाराष्ट्र अव्वल स्थानी


- ८० सुवर्णसह तब्बल २१३ पदकांची कमाई 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
   दुसऱ्या 'खेलो इंडिया' युवा स्पर्धांमध्ये यजमान महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे घवघवीत यश मिळवत अव्वल स्थान निश्चित केले. महाराष्ट्राने ८० सुवर्णसह तब्बल २१३ पदकांची कमाई केली. 
गेल्या वेळी महाराष्ट्राने ३६ सुवर्णपदके पटकावली होती. हरियाणाने ३८ सुवर्णपदके पटकावून पदकतक्त्यात अव्वल स्थान मिळविले होते. या वेळी महाराष्ट्राने हरियाणाला मागे टाकले आणि स्पर्धेचा समारोप होण्याच्या आदल्यादिवशीच महाराष्ट्राने पदकतक्त्यातील अव्वल स्थान निश्चित केले. महाराष्ट्राने सर्वाधिक १८ सुवर्णपदके पटकावली ती जलतरणात. त्यात मिहीर आंब्रे, युगा बिरनाळे, केनिशा गुप्ता, अपेक्षा फर्नांडिस, वेदांत बापना, करिना शांक्ता यांनी ठसा उमटविला. जिम्नॅस्टिक्समध्येही आपला ठसा उमटविला. जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राने १४ सुवर्णपदके पटकावली. त्यात आदिती दांडेकर, अरिक डे, सिद्धी-रिद्धी या जुळ्या हत्तेकर भगिनींनी आपली छाप पाडली. 
अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने १३ सुवर्ण पटकावली. वेटलिफ्टिंग व बॉक्सिंगमध्ये प्रत्येकी ९ सुवर्ण, खो-खोमध्ये ४ सुवर्ण मिळाली, मात्र कबड्डीत निराशा झाली. महाराष्ट्राला एकही सुवर्ण मिळविता आले नाही. एकेकाळी कुस्तीत दबदबा निर्माण केलेल्या महाराष्ट्राला केवळ चार सुवर्णपदके मिळाली. 

खेळनिहाय महाराष्ट्राची सुवर्णपदके 

जलतरण - १८ 

जिम्नॅस्टिक्स - १४ 

अथलेटिक्स - १३ 

वेटलिफ्टिंग - ९ 

बॉक्सिंग - ९ 

पदकतक्ता 

राज्य सुवर्ण रौप्य ब्राँझ एकूण 

महाराष्ट्र ८० ५९ ७४ २१३ 

हरियाणा ५५ ५१ ५७ १६३ 

दिल्ली ४७ ३४ ४८ १२९ 

कर्नाटक ३० २८ १९ ७७ 

तमिळनाडू २६ ३४ २१ ८१   Print


News - Rajy | Posted : 2019-01-20


Related Photos